सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती ऐवजी मैत्रीपूर्ण लढविल्या जातील, असे जाहीर केल्याने जिल्ह्यात आम्ही तशी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षाकडे नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी पुरेसे उमेदवार आहेत. त्यामुळे महायुती करून बंडखोरीला प्राधान्य का द्यायचे ? विरोधी पक्षाला बळ का द्यायचे ? असा प्रश्न करीत जिल्ह्यात आगामी निवडणुका महायुती म्हणून लढल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नीती आयोगाची टीम जिल्ह्यातील एआयचा अभ्यास करण्यासाठी येत असल्याचे सांगण्यासाठी जिल्हाधिकारी बैठक सभागृहात पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
शिक्कामोर्तब ! भाजपा सिंधुदुर्गात स्वबळावर











