श्री देवी चौंडेश्वरी चौक नामकरणाची मागणी मान्य

नगरसेवक जयेश धुमाळे यांच्या पाठपुराव्याला यश

कणकवली (प्रतिनिधी) : श्री देवी चौंडेश्वरी मंदिर हे कणकवली परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असून मंदिरालगतच्या चौकाला देवीचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक जयेश धुमाळे यांनी कणकवली नगरपंचायतीकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत सदर नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. नगरसेवक जयेश धुमाळे यांच्या मागणी नुसार श्री देवी चौंडेश्वरी मंदिरा नजीकच्या चौकास ‘श्री देवी चौडेश्वरी चौक’ असे नामकरण करण्यात यावे, या मागणीला कणकवली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सदर चौकास ‘श्री देवी चौंडेश्वरी चौक’ असे नामकरण करण्यास कणकवली नगरपंचायतीने मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे श्री देवी चौंडेश्वरी मंदिर परिसराला धार्मिक व सांस्कृतिक ओळख मिळण्यास मदत होणार असून, चौकाची ओळखही आता ‘श्री देवी चौंडेश्वरी चौक’ म्हणून निर्माण होणार आहे. नगरपंचायतीच्या या निर्णयाचे मंदिर परिसरातील नागरिक तसेच भाविकांकडून स्वागत होत आहे. नगरसेवक जयेश धुमाळे यांच्या मागणीला मिळालेल्या या मंजुरीमुळे परिसराच्या स्थानिक श्रद्धास्थानाला सन्मान मिळाला आहे.

error: Content is protected !!