नाटळ येथील सुधाकर सावंत (आप्पा) यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ (राजवाडी) येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त ग्रामसेवक सुधाकर महादेव सावंत (आप्पा) (वय ८४) यांचे बुधवारी रात्री राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आपल्या प्रदीर्घ शासकीय सेवेत त्यांनी एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि जनतेच्या अडीअडचणीला धावून जाणारे ‘आदर्श ग्रामसेवक’ म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात नावलौकिक मिळवला होता. निवृत्तीनंतरही सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या कार्यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
*(फोटो–सुधाकर महादेव सावंत)-

error: Content is protected !!