मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर नडगिवे येथे मोटार सायकल अपघात मध्ये दोघे जखमी

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे धुरीभाटले वाडी येथे एका अवघड वळणावर मोटर सायकल याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटर सायकलस्वार श्री प्रकाश कृष्णा मांजलकर वय ५१ राहणार कोंडये ता.राजापूर व शाम दत्तात्रय कोळसुलकर वय ६८ राहणार खारेपाटण हे दोघेजण जखमी झाले असून हा अपघात गुरुवार दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३.४५ च्या दरम्यान घडला. याबाबत अधिक वृत्त असे मूळ कोंडये ता.राजापूर येथील रहिवासी असलेला प्रकाश कृष्णा मांजलकर हा मोलमजुरी करून छोट्या मशीन ने झाडे कटिंग करून देण्याचे तसेच ग्रास कटर रान कटिंग करण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो आज खारेपाटण येथील काम आटपून तो आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र.MH-08BA1563 घेऊन नडगिवे च्या दिशेने जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चार चाकी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मोटार सायकलस्वार प्रकाश मांजलकर यांच्या डोक्याला मार बसल्याने ते गंभीर जखमी झाले तर त्याच्या पाठीमागे बसलेले शाम कोळसुलकर हे किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ गुरुप्रसाद कर्ले यांनी घटनास्थळावर जाऊन जखमी नागरिकांना खारेपाटण प्रा.आ. केंद्रात दाखल केले.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम यांनी जखमी वर प्राथमिक उपचार केले.तर गंभीर जखमी प्रकाश मांजलकर याला पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे १०८ ॲम्ब्युलन्स ने पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस शिपाई सुनील निकम पोलिस कॉन्स्टेबल उद्देश कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
याबाबत अधिक तपास खारेपाटण पोलिस दुरशेत्राचे पोलिस अधिकारी करीत आहेत.


error: Content is protected !!