खारेपाटण येथे नारळी पौर्णिमा उस्ताहात संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावात शिवकालीन नारळी पौर्णिमा हा सण पारंपरिक व धार्मिक पद्धतीने उस्ताहात साजरा करण्यात आला. गुरुवार दि.२७ ला सकाळ पासूनच खारेपाटण शिवाजी पेठ, बाजारपेठ नाका व खारेपाटण बसस्थानक आदी परिसरात नारळ लढवणे या पारंपरिक खेळास प्रारंभ झाला. यामध्ये स्थानिक युवक व युवती ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सहभाग होता. तर खारेपाटण मध्ये नारळी पौर्णिमा हा उत्सव आनंदाने साजरा करण्यात येतो.

खारेपाटण मध्ये नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने सुमारे दीड हजार पेक्षा अधिक नारळ लढविण्यात आले. यामुळे खारेपाटण येथे नारळ व्यापारास देखील चालना मिळाली. सायंकाळी संपूर्ण गावच्या वतीने मानाचा नारळ गावचे खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील शुक नदीत पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत अर्पण केला जातो. दरम्यान नारळी पौर्णिमे सारखे सण उत्सव साजरे करून आपली पारंपरिक कला व सांस्कृतिक वारसा यानिमित्ताने जपला जात आहे.

error: Content is protected !!