तंटामुक्ती समिती कोंडये च्या अध्यक्षपदी सिद्धार्थ तांबे !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत कोंडये ची ग्रामसभा नुकतीच पार पडली. या सभेत कोंडये महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी सिद्धार्थ शांताराम तांबे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सिद्धार्थ तांबे यांचा लोकसंपर्क, तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, सार्वजनिक कामातील लक्षणीय वावर, यामुळे त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी कोंडये ग्रामपंचायतचे सरपंच ऋतुराज तेंडुलकर, उपसरपंच रवींद्र तेली, सदस्य तसेच ग्रामस्थ यांनी त्यांचा उचित गौरव करून, अभिनंदन केले. आणि पुढील निपक्षपाती वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!