शिलाई मशीन दिलेल्या लाभार्थ्यांना टेलर साहित्य 2 दिवसांत वितरण करण्यात येणार
नांदगाव (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या मानव साधन विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग संस्थेच्या परीवर्तन केंद्रात समावेश करण्यात आला आहे. मानव साधन विकास संस्था संचलित जनशिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग ,सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्र, नांदगाव अंतर्गत माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सन्मा.सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून महिला सक्षमीकरण करण्यासाठी मागील वर्षी 10 महीलांना शिलाई मशीनचा लाभ समन्वयक संस्था किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट नांदगाव यांच्या सहकार्याने नांदगाव येथील महीलांना देण्यात आला होता. आता याच महीलांना सन्मा.सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण CSR निधीतून कात्री,मेजर टेप ,टेलर लाकडी मोजमापे पट्टी,रिळ , बॉबीन , रिंग केस, टेलर खडू , मशिन सुई आदी 10 महीलांचे साहीत्य नांदगाव येथील परिवर्तन केंद्र असलेल्या किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या जवळ सुपूर्द करण्यात आले असून येत्या दोन दिवसांत वितरण करण्यात येणार असल्याचे किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी सांगितले आहे.












