मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन…!
कणकवली तहसील कार्यालय व न.पं.मध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी…!
कणकवली (प्रतिनिधी): महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांचे विचार व आचार महान आहेत. त्यांचे विचार व आचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत. महापुरुषांनी समाजप्रबोधनाचे कार्य केले. त्यांचे हे कार्य आपण सर्वांनी मिळून पुढे नेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे उपजिल्हाधिकारी मच्छींद सुकटे यांनी केले. लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवली तहसीलदार कार्यालयात साजरी करण्यात आली. दरम्यान, केंद्रीयमंत्री
नारायण राणे यांची भेट घेण्यासाठी सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित उपजिल्हाधिकारी मच्छीद्र सुकटे कणकवलीत आले होते. तहसीलदार आर.जे. पवार यांच्या विनंती नुसार त्यांनी तहसीलदार कार्यालयाला भेट दिली. यावेळी श्री. सुकटे यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी आर.जे. पवार यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी
पुरवठा विभागचे प्रभारी निरीक्षक अधिकारी आर. एम. कांबळे, डी. एम. पाटील, मेघनाथ पाटील, मंडळ अधिकारी प्रभूदेसाई, तसेच कर्मचारी वृंद,लिंगायत समाजाचे जेष्ठ नागरिक मल्लिकार्जुन माळगी, निखिल घेवारी, अजित नष्टे,हरिष उचले,वृषभ मेनकुदळे,नेहा घेवारी,प्रियंका उचले, सौ.नष्टे आदी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार आर.जे.पवार यांनी याप्रसंगी आपण बसवेश्वर जयंती ही आपल्या कार्यालयात साजरी करत असल्याचे सांगत बसवेश्वर महाराज यांच्या बद्दल विचार व्यक्त करत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.तसेच तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते श्री.बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी बंडू हर्णे,नगरसेवक व नगरपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.