भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

दुचाकीचा चक्काचूर ; चालक जखमी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीलाधडक दिल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना आज बारा वाजण्याच्या सुमारास मळगाव-वेत्ये येथे चॉकलेट फॅक्टरी समोर घडली. जखमी दुचाकी चालकाला रिक्षा मधून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी दिली.दरम्यान मुंबई-गोवा हायवेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असताना त्या ठिकाणी ॲम्बुलन्स सोय नसल्यामुळे अनेक वेळा अडचणी येतात. त्यामुळे सोय करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित दुचाकी चालक जखमी असल्यामुळे त्याची नेमकी माहिती कळू शकली नाही.

error: Content is protected !!