राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग आणि डेडलिफ्ट स्पर्धेत बॉडी टेम्पल फिटनेस सेंटरचे घवघवीत यश

कणकवली (प्रतिनिधी) : ठाणे येथील कळव्यातील मनीषानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग आणि डेडलीफ्ट स्पर्धेत कणकवली येथील बॉडी टेम्पल फिटनेस सेंटरच्या खेळाडूंनी उत्कर्ष कामगिरी करत पडकांची कमाई केली. सब जुनिअर गटात ओंकार रजपूत सुवर्ण पदक तर हिरल गुरव हिला रौप्य पदक, ज्युनिअर गटात साईराज घाडी – पॉवर लिफ्टिंग, बेंचप्रेस, डेडलीफ्ट सुवर्ण पदक, साईप्रसाद मोडक – रौप्य पदक, सोनू रजपूत रौप्य पदक, शुभम गावडे रौप्य पदक, सिनियर गटात सायली अमृतसगार सुवर्ण पदक, श्वेता अमृतसगार सुवर्ण पदक, अमोल गुरव पिवरलिफ्टिंग तसेच डेडलीफ्ट मध्ये कांस्य पदक, समीर कदम कांस्य पदक या सर्व खेळाडूंचे बॉडी टेम्पल परिवाराकडून तसेच पॉवरलिफ्टिंग असोसिएशन मार्फत अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!