सावंतवाडी (प्रतिनिधी) : इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी नगरपरिषदेच्या ६० सफाई कामगारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आल्या. या कामगारांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी यावेळी स्वेटर तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या अध्यक्षा मृणालिनी कशाळीकर, सेक्रेटरी भारती देशमुख, खजिनदार देवता हावळ, संपादक नेत्रा सावंत, तसेच अनिता भाट, दर्शना रासम, शुभदा करमरकर, वैभवी शेवडे, सुहानी तळेगावकर, दर्शना बाबरदेसाई, सायली दुभाषी, निता रेडीज, मिनल नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.












