स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकबाबत आचारसंहितेची करणार घोषणा ?
मुंबई (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी 4 वाजता सचिवालय जिमखाना येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.या पत्रकार परिषदेला राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे संबोधित करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहितेबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे












