कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघ, कणकवली व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.”रक्तदान हेच जीवनदान” असा संदेश देत शनिवार ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत भवानी सभागृह तेलीआळी, कणकवली येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कणकवली तालुका पत्रकार संघ अध्यक्ष भगवान लोके 94223 94505,सचिव संजय सावंत 90113 90699,सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली शाखा मकरंद सावंत 9420306048,अमोल भोगले 94212 35586, विनायक महाडिक 86008 85544,दुर्गाप्रसाद काजरेकर 82753 90862, सुहासिनी कुलकर्णी 86007 65458 यांच्याकडे रक्तदात्यांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.












