फोंडाघाट ग्रामपंचायती तर्फे बाजारपेठेतून स्वच्छता रॅलीचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान च्या अनुषंगाने ग्रामपंचायत फोंडाघाट मार्फत फोंडाघाट बाजारपेठ परिसरात स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे स्वच्छतेचे विविध संदेश देण्यात आले. स्वच्छतेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. त्यानंतर फोंडाघाट बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.

रॅलीमध्ये न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटचे विद्यार्थी व शिक्षिका आर्या भोगले त्याचप्रमाणे शाळा नंबर एक येथील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. सोबत सरपंच संजना आग्रे, उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन राजन नानचे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सावंत, मिथिल सावंत, विठ्ठल लाड, स्नेहलता पांचाळ, प्राची धुरी, सायली तेली, प्रीतम भोगले, पवन भालेकर, अनिकेत पारकर, मिलिंद लाड तसेच अंगणवाडी सेविका सायली कदम, मानसी सावंत, रेवडेकर ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील मुलांनी ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

error: Content is protected !!