प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणच्या वतीने प्रवीण लोकरे यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक प्रवीण दिगंबर लोकरे यांची नुकत्याच्या झालेल्या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटणच्या वतीने संस्था कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे व संचालक संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते प्रवीण लोकरे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यलक्षी संचालक शुभम मोरे, खारेपाटण शिक्षण संस्थेचे सचिव महेश कोळसुलकर, तसेच प.पू. भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी खारेपाटण शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण लोकरे सहकारी संस्थेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेछा देण्यात आल्या.

error: Content is protected !!