हरयानातील गुडगाव जवळील उच्चभ्रू कुटुंबातील कँरोलिना मुंबईत जगत होती निराधार जीवन
जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रम टिमने शोधले कँरोलिनाचे कुटुंबिय
खारेपाटण (प्रतिनिधी) : कँरोलिना कपूर , वयः ४२ वर्षे…..ही मुंबईच्या स्वप्ननगरीत नसिब अजमावण्यासाठी हरयानातील गुडगावहून आलेली व विदेशात MBBS चे वैद्यकीय शिक्षण घेतलेली युवती मुंबईतील रस्त्यावर वंचिततेचे जीवन जगत होती. या निराशाग्रस्त युवतीला गोरेगाव पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी अत्यंत आजारी अवस्थेत ( डोक्याच्या जखमेत असंख्य किडे झालेल्या अवस्थेत ) दिनांकः३१ डिसेंबर,२०२२ रोजी आश्रयासाठी जीवन आनंद संस्थेच्या विरारफाटा येथील समर्थ आश्रमात दाखल केले. दरम्यान कँरोलिना कपूर ही युवती मे ते डिसेंबर-२०२२ दरम्यान मुंबईतील अन्य एका संस्थेच्या शेल्टरमधे निवासी राहीली होती.
कँरोलिना आश्रमात दाखल झाल्या दिवसापासून समर्थ आश्रम कार्यकर्त्यांच्या टिमने गुगल सर्च माध्यमाद्वारे दिल्ली, हरयानातील पोलिसांमार्फत तिच्या नातलगांचा शोध घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले
अखेर २१ दिवस सलग व विविध प्रकारे केलेल्या प्रयत्नांमुळे जीवन आनंद संस्थेच्या कौन्सेलर आदिती ग्वुईन यांना रुग्ण कँरोलिना कडूनच समुपदेशन दरम्यान कुटुंबियांपर्यंत संपर्क करण्यात यश मिळाले....आणि कुटुंबियांशी २० जानेवारी रोजी संपर्क झाल्यानंतर कँरोलिनाचे आई सूरज कौर आणि बहिणीच्या मुलीशी फोनद्वारे बोलणेही झाले.
अखेर नुकतेच कँरोलिनाचे काका राजेश कुमार आणि भावोजी संजिव कुमार हे कँरोलिनास घरी घेवून जाण्यासाठी खाजगी वाहनाने मुंबईत दाखल झाले.गोरेगाव पोलिस स्टेशनला नातलग व्हेरिफिकेशनची प्रक्रीया रितसर पुर्ण करण्यात आली.व्हाट्सअपद्वारे पोलिसांनी कँरोलिनाच्या आईवडिलांशी संवाद साधून आवश्यक खात्री केल्यानंतर आलेल्या नातलगांना रुग्ण कँरोलिनाला घरी नेण्यासाठी पोलिसांचे नाहरकर पत्र देण्यात आले.
आज समर्थ आश्रममधे कँरोलिनाला औक्षण करून सृदृढ आणि निरोगी जीवनासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.समर्थ आश्रमातील कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले आहे.प्रकृती बरी झाल्यावर मी आश्रमात येऊन सेवा करील असे कँरोलिनाने निरोप घेताना म्हटले.
जीवन आनंद संस्था संदिप परब यांनी विविध कारणांनी रस्त्यावर निराधार वंचिततेचे जीवन जगणारी माणसं आणि दारिद्र्याच्या कारणाने कुटुंबांसह पदपथावर वंचिततेचे जीवन जगणा-या माणसांना माणूसकीचे सन्मानजन्य जीवन मिळवून देण्यासाठी दहा वर्षांपुर्वी सहकारींसह स्थापन केली.सद्यस्थीतीत राज्यातील मुंबई, पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आणि गोवा राज्यात सुरू असलेल्य संस्थेच्या आश्रम,शेल्टर होम आणि पदपथावरील बालकांसाठीच्या डे केअर सेंटर्स द्वारे विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
समर्थ आश्रमच्या टिममधील आदिती ग्वुईन, उज्वला जाधव, भाईदास माळी, दिपक (आबा) अडसुळे,वैशाली काकड, दिपाली मेघा-माळी,चंदा छेत्री ,सचिन पडते,शिवानी शेंगाळे यांचेसह विश्वस्त किसन चौरे यांनी कुटुंब व नातलग शोधकार्यात भूमिका निभावण्यासह कँरोलिनाची आश्रमात काळजी घेतली.

















