हुंबरट ग्रा. पं. उपसरपंचपदी नितीन हरिश्चंद्र बागवे यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : हुंबरट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन हरिश्चंद्र बागवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच निवडणूक पदासाठीची सभा ग्रामपंचायत हुंबरट येथे आज दुपारी घेण्यात आली. सदरची सभा ग्रामपंचायत सरपंच मनीषा मनोहर गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये नितीन हरिश्चंद्र बागवे यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच संदीप होळकर तसेच इतर सदस्य सुयोग माणगावकर, प्रेरणा दळवी, शरीफा काझी, सुचिता दळवी, रिया पांचाळ, मोहन गुरव, ग्रामपंचायत अधिकारी वैभव ठाकूर, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश गुरव, सुनील गुरव, किशोर गुरव, मयुरी विकाळे तसेच ग्रामस्थ मनोहर दळवी (गुरुजी), कमलाकर चव्हाण, विशाल सावंत, मधुकर चव्हाण, विश्वनाथ घाडी, रवींद्र दळवी, दिवेश चव्हाण, कोमल चव्हाण, नीतिका बागवे, लक्ष्मी खांदारे, सुनीता गुरव, हर्षदा सावंत, नीत्या गुरव, भाविका घाडी, साजिदा मुद्दतसर, हमीदा काझी इत्यादी गावातील ग्रामस्थ तसेच कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी नवनियुक्त उपसरपंच यांचे पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन अभिनंदन करण्यात आले.

error: Content is protected !!