राष्ट्रीय काँग्रेस स्वतंत्र लढवणार कणकवली नगरपंचायत निवडणूक

नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदाच्या जागा लढवणार – पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रीय काँग्रेसने हात निशाणीवर कणकवली नगरपंचायत निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कणकवली नगरपंचायत निवडणूक राष्ट्रीय काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. नगराध्यक्ष पदासाठी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर इच्छुक असल्याचे मुलाणी यांनी सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, प्रवीण वरुणकर, शहराध्यक्ष अजय मोर्ये, अमित मांडवकर, महेश तेली आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!