डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांचे कडून विशेष कौतुक !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया या संस्थेने सप्टेंबर २०२५ मध्ये घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेत कु.वैष्णवी विजयकुमार शेट्ये हिने निर्विवाद यश मिळविले. सीए होण्यासाठी आवश्यक असलेल्या फाउंडेशन, इंटरमिजिएट व फायनल या तीनही परीक्षेत वैष्णवी ने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. दोन्ही ग्रुप घेऊन सीएच्या परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण कठीण असते. अशा परिस्थितीत वैष्णवी ने हे काठीण्य चिकाटीने, जिद्दीने आणि सातत्यराखून, अथक परिश्रमाने आणि आत्मविश्वासाने सामोरे जात, अभ्यासातून पूर्ण करून दाखविले.
यावेळी, कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट चिकाटीने केल्यास,सहज शक्य होते. असे तिने मनोगत व्यक्त केले. वैष्णवी ने शालेय शिक्षण दापोली येथे तर महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथे तसेच सीए परीक्षेचे ची तयारी पुणे येथे राहून पूर्ण केली. या यशाचे कौतुक करतांना डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे यांनी वैष्णवीचा विशेष सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. वैष्णवी नाधवडे गावचे नामदेव शेटे (शेटेगुरुजी) यांची नात तर फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राचे विद्यावेता डॉ. विजय शेट्ये यांची कन्या होय ! नाधवडे गावचा अभिमान, वैष्णवीचे पंचक्रोशीत सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे….










