बारसुत दुसरं जालियनवाला बाग हत्याकांड घडेल- खासदार विनायक राऊत

बारसूत आंदोलकांना ठेचण्याचा प्रयत्न सुरू- विनायक राऊत

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील बारसु मधील रिफायनरी प्रकल्पा विरोधात आता जनता आक्रमक झाली आहे. विरोध करत असलेल्या विरोधकांना काल पोलिसा कडून लाठी चार्ज करण्यात आला तसेच उष्माघातामुळे काही महिलांना रुग्णालयात न्याव लागलं.यावर बोलताना खासदार विनायक राऊत म्हणाले की बारसूत चाललेली ही स्थिती पाहता दुसरे जालियनवाला बाग हत्याकांड घडेल. बारसूत पोलिसांचा अफाट फौज फाटा असून आंदोलकांना ठेचण्याचा प्रयत्न सुरू आहे तसेच मिंधे सरकारकडून रिफायनरी रेटण्याचा प्रयत्न सुरू आहे हा सर्व परप्रांतीयांच्या जमिनींसाठी रिफायनरीचा घाट घातला जातोय अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.

error: Content is protected !!