पालकमंत्री नितेश राणेंची शब्दपूर्ती
जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणें च्या हस्ते शुभारंभ
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केलेला लोरे ते गडमठ रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण कामाचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला. लोरे – गडमठ ह्या मुख्य रस्त्याची दैनावस्था झाली होती. रस्त्याचे नूतनीकरण करावे अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी पालकमंत्री नितेश राणेंकडे पाठपुरावा केला होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी या रस्त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर केला. या रस्त्याचे भूमिपूजन जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पं. स. सदस्य मंगेश लोके, संजय गांधी निराधार समिती सदस्य सिद्धेश रावराणे, लोरे ग्रा पं सदस्य रितेश सुतार, लोरे सरपंच विलास नावले, आचिर्णे सरपंच वासुदेव रावराणे, नाना रावराणे, प्रकाश गव्हाणकर, आदेश रावराणे, छोटू रावराणे, सहदेव मोहीते, नागेश आडके, भालचंद्र रावराणे, भास्कर पांचाळ, लक्षण गोसावी, उन्नती पावले, लक्ष्मण सुतार, अशोक पियाळकर, डोंगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.










