संदेश सावंत, संजना सावंत यांचा पाठपुरावा
कणकवली (प्रतिनिधी) : भिरवंडे गावातील वेगवेगळ्या योजनेतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्याप्रमुख उपस्थितीत जेष्ठ मान्यवर, नीलकंठ सावंत, अनिल सावंत, व विजय सावंत पटेल यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने भिरवंडे मुख्य रस्ता ते घाग वाडी पर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, सात लाख, भिरवंडे खालची जांभूळ भाटले वाडी गणेश घाट जवळ जाणारी पायवाट बांधणे, पाच लाख, तर पूनाळ वाडी येथील जगन्नाथ दिनकर सावंत घरी ते नामदेव राजाराम सावंत यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडिकरण करणे (शेरडकरवाडी) पाच लाख, आदी कामांचा समावेश असून या कामांसाठी माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेशजी राणे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत व संजना सावंत यांनी पाठपुरावा केला आहे या शुभारंभ वेळी शिंदे सेना उपतालुका प्रमुख सुनील सावंत भाजप शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत, नीलकंठ सावंत, भिरवंडे सोसायटी संचालक मंगेश उर्फ नाना सावंत, प्रकाश उर्फ भाई सावंत, अनिल सावंत, काका सावंत, रामकृष्ण सावंत, विजय सावंत पटेल, यतीन सावंत, मधू सावंत, दामू सावंत, पांडूकाका सावंत, उदय सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.















