खारेपाटण (प्रतिनिधी) : कुणकवण, बौध्दवाडी, ता. देवगड येथील रहिवासी असलेले बौद्ध समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठू रामचंद्र जाधव यांचे नुकतेच रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी कुणकवण या त्यांच्या मूळ गावी वृद्धापकाळाने निधन झाले. विठू रामचंद्र जाधव हे कुणकवण ग्रामपंचायतीचे माजी ग्रा. पं. सदस्य होते. तर बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गावच्या धार्मिक व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी म्हणून देखील त्यांनी काही काळ काम केले होते.
याबरोबरच कुणकवण बौद्ध विकास मंडळ ग्रामीण शाखेचे ते विद्यमान अध्यक्ष होते. कुणकवण बौध्दवाडी येथे बुद्धविहार निर्मिती मध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या निधनाने बौद्ध समाजातील एका जेष्ठ कार्यकर्त्याला स्थानिक समाज मुकला असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुने, नातवंडे व पुतणे असा परिवार आहे. तर त्यांचा जलदान विधी व पुण्यानुमोदम तसेच शोकसभेचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी कुणकवण बौद्धवाडी येथे रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी स. १०.३० वाजता होणार आहे. तरी या श्रद्धांजली शोकसभा कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जाधव कुटुंबीय व स्थानिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












