स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिनानिमित्त योग-मेडिटेशन कार्यक्रमाचे आयोजन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आर्ट ऑफ लिविंग तर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन यानिमित्त योगा व मेडिटेशन कार्यक्रम घेण्यात आला. गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात सुदर्शन क्रिया व योग, ध्यानधारणा या संदर्भात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन दिले.
यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदूर्ग डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हा न्यायाधीश व ॲडिशनल सेशन न्यायाधीश श्रीमती देशमुख, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश व ॲडिशनल सेशन न्यायाधीश श्री. इंदुलकर, मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. चेंडके, श्री. देशिंगकर, श्री. नडगदल्ली व श्रीमती. पाटील, जिल्हा सरकारी वकील ॲड. संदीप राणे आदी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिविंगचे सदस्य चार्टड अकाऊटंट शंकर धुरी, नंदकुमार आरोलकर, वैशाली मुळे, ॲड. गायत्री मालवणकर, ॲड. उल्का पावसकर व मानसी वायंगणकर यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात तणावमुक्त जीवन, मानसिक शांतता, आरोग्यदायी जीवनशैली, मानवी मूल्यांची जपणूक, समाजात सलोखा आणि सेवा, तणाव, चिंता, नैराश्य कमी करण्यासाठी योग व ध्यान, शरीर व मन यांचा समतोल, एकाग्रता वाढवण्यासाठी, सुदर्शन क्रिया, विशेष श्वसन पद्धत, मन शांती याबाबत आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक उमेश वायंगणकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना ॲड. उल्का पावसकर यांनी केली.












