खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाद्वारे (MSB) आयोजित केल्या जाणाऱ्या रेखा कला स्पर्धेमध्ये खारेपाटण शेठ न. म. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.विद्यार्थ्यांच्या या या घावघवीत यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या या परीक्षेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर रेखाचित्रे,डिझाइन,भूमिती आणि स्मरणशक्तीवर आधारित चित्रे काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना कलेमध्ये मजबूत पाया मिळतो आणि पुढील उच्च शिक्षणासाठी व व्यावसायिक संधींसाठी मदत होते. शेठ न. म. विद्यालय खारेपाटण मधील खालील विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवित उज्वल यश संपादित केले आहे.
एलिमेंटरी परीक्षा – २०२५ मध्ये सहभागी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे –
कु. आर्या निलेश करांडे (श्रेणी अ ) कु. अनुष्का विनोद सुतार (श्रेणी अ ), जय प्रशांत सुतार (श्रेणी ब), रितेश गोरक्षनाथ गायकवाड (श्रेणी ब ), कु. सांगवी संदीप जामसंडेकर (श्रेणी ब ), कु. आराध्या प्रकाश निग्रे (श्रेणी क ), कु. अनुश्री हरिहर सरवणकर (श्रेणी क), चिन्मय मंगेश गुरव (श्रेणी क), निलेश संजय गारगुंडे (श्रेणी क), रेवण अनंत राऊळ (श्रेणी क), कु.श्रावणी सत्यवान सुतार (श्रेणी क), कु.सिद्धी सचिन राऊत (श्रेणी क), कु.वेदिका अनिल पवार (श्रेणी क) तर
इंटरमेडिएट परीक्षा – २०२५ परीक्षेमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे —
कु. तहसीन मु अहमद पटेल (श्रेणी अ ), कु. ऋतुजा गो. गायकवाड (श्रेणी ब ), कु. अनुराग सचिन महिंद्रे (श्रेणी क), कु. प्रतिभा शिवाजी पतीयान (श्रेणी क), समर्थ बाळासाहेब जाधव (श्रेणी क) कु. स्वरा रमेश जामसंडेकर (श्रेणी क), तनुश्री लवेश सौंदळकर (श्रेणी क), कु. वैष्णवी रवींद्र पांचाळ (श्रेणी क) वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील चित्रकला शिक्षक श्री गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.














