सरपंच पी के चौकेकर यांच्या हस्ते शुभारंभ
चौके (प्रतिनिधी) : जि. प प्राथमिक शाळा चौके नं 1 येथे सरपंच पी. के. चौकेकर यांच्या हस्ते शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी जि.प. बांधकाम अभियंता नितीन पवार,ग्रामपंचायत अधिकारी लक्ष्मण सरमळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन गावडे, उपाध्यक्ष पूर्व गावडे,शाळेच्या मुख्याध्यापिका भागश्री कुनुरे, शिक्षिका मनीषा डाके, भारती सांडव, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौककर,जयश्री कदम, अंगणवाडी सेविका भारती सांडव, पालक जितेंद्र भगत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शासनाकडून मंजूर झालेल्या कामाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने शासनाचे तसेच उपस्थित मान्यवरांचें आभार मानण्यात आले.












