सात माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळाला लाभ
सलग तीन वर्षे कॅनरा रोबेको कंपनी राबवतेय शैक्षणिक, सामाजिक उपक्रम

चौके (अमोल गोसावी) : कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड, असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सी. एस. आर. फंडातून मालवण तालुक्यातील ६ आणि कुडाळ तालुक्यातील एक अशा एकूण ७ माध्यमिक शाळामधील गरीब, होतकरू आणि गरजू २५० विद्यार्थ्यांना मोफत सायकल व सोबत हेल्मेट वाटप करण्यात आले. सोमवार १२ जानेवारी आणि मंगळवार १३ जानेवारी २०२६ या दोन दिवशी कॅनरा रोबेको कंपनीचे आय. टी. हेड दीपेश गोसावी, कंपनीच्या गोवा शाखेचे सेल्स मॅनेजर सुरज साळगावकर, गोवा ब्रांच ऑपरेशन इन्चार्ज स्नेहल मातोंडकर आणि पत्रकार अमोल गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ शाळांमधील लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत सायकली व सोबत हेल्मेट वाटप करण्यात आल्या.
दरम्यान सोमवारी १२ जानेवारी रोजी सकाळी कुडाळ तालुक्यातील एस. एल. देसाई विद्यालय पाट आणि कै. सौ. एस. आर. पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाट या शाळेतील विद्यार्थ्यांना ७० सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष देवदत्त साळगावकर, सचिव विजय ठाकूर, खजिनदार दिपक पाटकर, मुख्याध्यापक राजन हंजनकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
त्यानंतर मालवण तालुक्यातील श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे मधील २५ गरजू विद्यार्थ्यांना कॅनरा रोबेको कंपनीच्या मान्यवर अधिकाऱ्याच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक अविनाश परब, संस्था सल्लागार केशव सावंत आणि लिपिक संजय गोसावी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

याबरोबरच चौके येथील भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय चौके या प्रशालेतील २५ विद्यार्थ्यांनाही मोफत सायकल कॅनरा रोबेको कंपनी मार्फत वितरित करण्यात आल्या. याठिकाणी संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, मुख्याध्यापिका रसिका गोसावी, पत्रकार नितीन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सायंकाळी वराड येथील सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर वराड या प्रशालेतील ५० होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना कॅनरा रोबेको कंपनीचे आयटी हेड दिपेश गोसावी, सेल्स मॅनेजर सुरज साळगावकर आणि स्नेहल मातोंडकर यांच्या हस्ते मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी संस्था अध्यक्ष देवेन ढोलम, सदस्य विनोद आळवे, वसंत वराडकर, प्रदिप मिठबावकर, वराड सरपंच शलाका रावले, उपसरपंच गोपाळ परब, मुख्याध्यापिका प्रिया मयेकर, उद्योजक समीर रावले, ग्रामस्थ नारायण बाक्रे आणि पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्था अध्यक्ष देवेन ढोलम यांनी कॅनरा रोबेको कंपनीचे आभार व्यक्त करताना असे प्रतिपादन केले की, “आपण आमच्या विद्यार्थ्यांची अत्यंत महत्वाची गरज पूर्ण केली आहे. आजपासून आमच्या विद्यार्थ्याची दररोजची तीन ते चार किलोमीटरची पायपिट थांबणार आहे. मुलांचा वेळ वाचून त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येणार आहे. आपण दिलेल्या या बहुमूल्य देणगीबद्दल संस्था आपली सदैव ऋणी राहिल.” तसेच यावेळी विद्यार्थ्यांनीही मनोगतातून कॅनरा रोबेको कंपनी आणि उपस्थित मान्यवर अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

याबरोबरच मंगळवार दिनांक १३ जानेवारी रोजी सकाळी मालवण तालुक्यातील देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुल देवबाग मधील २५ गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना कंपनी अधिकारी दिपेश गोसावी यांच्या हस्ते मोफत सायकल वितरित करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास येरागी, संस्था सदस्य निलेश सामंत, सोनिया चोडणकर, मुख्याध्यापिका रचना खोबरेकर, लिपिक रुपेश खोबरेकर इतर सहाय्यक शिक्षक पालक आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
त्यानंतर माळगाव येथील ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कुल माळगावमधील २५ विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही मोफत सायकल वितरित करण्यात आल्या. याठिकाणी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड कंपनीचे आयटी हेड दिपेश गोसावी, सेल्स मॅनेजर सुरज साळगावकर, स्नेहल मातोंडकर, संस्था उपाध्यक्ष अरुण भोगले, सचिव हेमंत हडकर, खजिनदार महादेव सुर्वे, सदस्य सुधीर पडेलकर, प्रविण धामापुरकर, मुख्याध्यापक बेनके, माजी मुख्याध्यापक गिरी, माजी विद्यार्थी सचिन तोंडवळकर, पत्रकार अमोल गोसावी, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान कॅनरा रोबेको कंपनीच्या या बहुमोल देणगी बद्दल संस्था उपाध्यक्ष अरुण भोगले यांनी दिपेश गोसावी तसेच त्यांची टीम आणि कंपनीचे आभार व्यक्त केले.
तसेच सायंकाळी मालवण तालुक्यातील माध्यमिक विद्यालय असरोंडी या शाळेतही ३० गरजू विद्यार्थ्यांना कॅनरा रोबेको कंपनी मार्फत मोफत सायकल वितरित करण्यात आल्या. यावेळी संस्था सचिव प्रकाश सावंत, उपाध्यक्ष उदय सावंत, खजिनदार विनायक सावंत, सहसचिव प्रदीप सावंत, मुख्याध्यापक सुशांत पाटील ज्येष्ठ शिक्षक कमलेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
वरील सर्व शाळामधील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरण प्रसंगी मार्गदर्शन करताना कॅनरा रोबेको कंपनीचे आयटी हेड दिपेश गोसावी यांनी असे प्रतिपादन केले की, “ग्रामीण भागात वाहतुकीच्या मर्यादीत सुविधा असल्याने लांबून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळेत यावे लागते, विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड, असेट मॅनेजमेंट कंपनी गेली 3 वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांना अभ्यास करण्यासाठी अधिक वेळ मिळावा व त्यांचे आरोग्य ही सुदृढ रहावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सायकलचा योग्य वापर करून स्वतःची प्रगती साध्य करावी आणि स्वतः वापरून झाल्यावर या सायकलं आपली लहान भावंडे आणि गरजू मुलांना द्याव्यात जेणेकरून त्यांनाही या सायकलचा लाभ घेता येईल. याबरोबरच तुम्ही भावी काळात यशस्वी झाल्यानंतर तुमच्या शाळेकडे नक्की बघा आणि शाळेला शक्य ती मदत करा. कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड हा पोस्ट आणि बँकेप्रमाणेच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असून यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही केलेली छोटी छोटी गुंतवणूक भविष्यात फार मोठा परतावा देऊ शकते. एसआयपी या पर्यायातून तुम्ही छोट्या रकमेतून गुंतवणूक कॅनरा रोबेको कंपनी मध्ये गुंतवणूक करू शकता. लोकांमध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी कंपनीच्या वतीने आर्थिक साक्षरता मार्गदर्शन शिबिरेही घेतली जातात. याचाही आपण लाभ घेऊ शकता असे आवाहन केले.
कॅनरा रोबेको कंपनीच्या या बहुमोल देणगीबद्दल सातही शाळेच्या संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी आभार व्यक्त केले.
















