कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, आणि जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स कळसुली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शंभर टक्के निकाल साध्य केला आहे. यामध्ये एलिमेंट्री परीक्षेसाठी 30 विद्यार्थी तर इंटरमिजिएट परीक्षेसाठी 32 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केल आहे. या घवघवीत यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. या परीक्षेत A श्रेणीत चार विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. त्यामध्ये कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री, कु. अश्मित शैलेश मुळीक, कु. दुर्वांक संदीप सावंत व कु. श्रावणी संतोष राणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक अमर पवार यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे यांनी नमूद केले कळसुली इंग्लिश स्कूलने मिळवलेल्या या यशामुळे परिसरात शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.














