ओरोस (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठक शुक्रवार १६ जानेवारी, २०२६ रोजी प्रहार भवन कणकवली येथे सकाळी १०:३० वाजता होणार आहे. या बैठकीला खा. नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अजित गोगटे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व जिल्हा पदाधिकारी, विशेष निमंत्रित, निमंत्रित, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सर्व मोर्चा, प्रकोष्ट, जिल्हाध्यक्ष, जिल्हा संयोजक, मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, लोकप्रतिनिधी, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे यांनी केले आहे.
१६ जानेवारीला कणकवलीतील प्रहार भवन येथे भाजपा जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक












