बालमंदिर कनेडी प्रशालेत ‘क्रीडा महोत्सव’ उत्साहात साजरा

​कणकवली (प्रतिनिधी) : येथील कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालमंदिर कनेडी प्रशालेत ‘क्रीडा महोत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.​या क्रीडा महोत्सवाचे औचित्य साधून प्रशालेत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि खिलाडूवृत्तीने सहभाग नोंदवला. पालकांच्या सहभागातून सर्व विद्यार्थी खेळाडूंना अल्पोपहार देण्यात आला.

​याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका ग्रेसी चोडणेकर यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक शिक्षक आर. पी. घोन्साल्वीस, डी. एस. चांदोस्कर आणि एम. एच. डोंगमोडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन करून या महोत्सवाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!