नाटळ मतदारसंघात भाजपाचे वजन वाढले
कणकवली (प्रतिनिधी) : दिगवळे गावचे उ. बा. ठा. सेनेचे शाखाप्रमुख रुपेश गावकर व संतोष कुबल यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करून भाजपची ताकद वाढवली. हा प्रवेश भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे दिगवळे गावातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून उ. बा. ठा. सेनेला मोठा धक्का यावेळी भाजप मंडल उपाध्यक्ष विजय भोगटे, सरपंच संतोष गावकर, राजेश पवार, बूथ कमिटी अध्यक्ष भाई साळगावकर तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रवेशामुळे दिगवळे गावात भाजप अधिक मजबूत होणार असून आगामी निवडणुकांमध्ये भाजपची घोडदौड वेग घेईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.












