महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने सराव परिक्षेचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्ग यांच्यावतीने गुरूवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी शाळेची दुर्वा कोळेकर हिने वैभववाडी तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावून आपल्या शाळेचे नाव उज्वल केले आहे. याबद्दल तिचे शाळा समिती चेअरमन बाप्पी मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नाधवडे गावचे उपसरपंच गोपाळ उर्फ प्रफुल्ल कोकाटे, उपाध्यक्ष श्रीमती कांबळे, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, वैभववाडी तालुक्याचे माजी उपसभापती दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर, माजी सरपंच सूर्यकांत कांबळे, शैलजा पांचाळ, नाना बंड, बाबा कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे, पदवीधर शिक्षक पंढरीनाथ सावंत, संदीप कोळेकर, सुजाता कुडतरकर यांनी दूर्वा कोळेकर आणि यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.












