मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत खारेपाटण जि.प. केंद्र शाळा नं.१ ची तालुकास्तरीय समितीकडून पाहणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील राज्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल म्हणून ओळख असणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला १५ जानेवारी रोजी तालुकास्तरीय समितीने भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी खारेपाटण केंद्रशाळेची पाहणी करण्यासाठी आलेल्या तालुकास्तरीय समितीमध्ये कणकवली गट शिक्षणाधिकारी किशोर गवस, केंद्रप्रमुख नारायण ओटवकर, कणकवली पं.स. विस्तार अधिकारी प्रथम शामराव जाधव, केंद्रप्रमुख सुभाष देवराम महाले आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. खारेपाटण जि.प. केंद्रशाळेच्या वतीने शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी उपस्थित समिती सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत केले.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत प्राथमिक शाळांचे मूल्यमापन करून राज्यातील आदर्श शाळांचे नामांकन करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असते. या अंतर्गत खारेपाटण जि.प. केंद्र शाळेची केंद्रातून निवड झाली असून आता ही शाळा तालुका स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर उपक्रमांतर्गत तपासणी करीता आलेल्या तालुका स्तरीय समितीने खारेपाटण केंद्र शाळेची अंतरंग व बाह्यरंग यांसह शाळेची भौतिक सोयी सुविधांची संपूर्ण पाहणी केली. याबरोबरच शासनाने ठरवून दिलेल्या प्रश्नावली व निकषाप्रमाणे संपूर्ण शाळेची तपासणी केली.

यावेळी शाळेचे पदवीधर शिक्षक मिलिंद सरकटे, शीतल राठोड, सहाय्यक शिक्षिका आरती जोजेन, समिधा राऊत, दीपिका चव्हाण, शिवलीला निडसोसी, श्रीम.चौधरी, श्रीम.अबिदा काझी आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!