सिद्धी हिवाळेकर,संकल्प परब गुणवत्ता यादीत

पोईप हायस्कुलचे एन एम एम एस परीक्षेत यश

मसुरे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस परीक्षेत पोईप येथील सौ इं.द.वर्दम हायस्कूल कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले आहे. या परीक्षेत प्रशालेच्या संकल्प रामचंद्र परब व सिद्धी संतोष हिवाळेकर यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अनिल कांदळकर, सर्व संस्था संचालक यांनी अभिनंदन केले आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही एन कुंभार व कारंडे सर याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!