बारसू अशांत करण्याचा मातोश्री चा आदेश ; आ. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

कणकवली (प्रतिनिधी): अडीज वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार आल्यापासून महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक दंगली यांनी घडविल्या लॉंग मार्च आणि आता बारसु असेल सगळीकडे राज्य अशांत ठेवण्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा राहिला आहे. देवेंद्र फडणवीस हे मॉरिशस वरून दंगल घडवत आहेस असे हा नालायक संजय राऊत बोलतोय दंगलीचे आदेश मातोश्री वरून येत आहेत. विनायक राऊत आणि उद्धव ठाकरेंचे फोन तपासले पाहीजेत मातोश्री वरून कोकण पेटवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे टोळीचा सुरू आहे. संजय राऊतने गोळ्या झाडण्याची भाषा करु नये कारण गोळ्या झाडण्याच षडयंत्र कोण रचतय बारसु मध्ये बाहेरची माणस कोण घेऊन आलय याची चौकशी पोलिसांनी करावी. उद्धव ठाकरे कुठल्या गँगच्या संपर्कात आहेत याची चौकशी झालीच पाहिजे. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही तो प्रकल्प करणार नाही. उद्धव ठाकरे हा कोकणाला लागलेला शाप आहे, कोरोना आहे. त्यांनीच आतापर्यंत अनेक प्रकल्प आले त्याठिकाणी वातावरण पेटवण्याच काम उद्धव ठाकरे करत आहे. उद्धव ठाकरे विनायक राऊत आपल्या मुलांसाठी व संजय राऊत ज्या प्रमाणे आपल्या मुली साठी धंदे उघडतोय तुम्हाला तुमच्या मुलांची चिंता आहे आमच्या कोकणातील सामान्य माणसाच्या मुलांनी रोजगार मिळवायचा नाही का? बारसु मध्ये जो प्रकार घडला त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. संजय राउतनी मराठा मोर्चाला हिनवले आमच्या माता बघींनीचा अपमान केला छत्रपतींच्या वंशजांचा पुरावा मागणारा हाच नालायक संजय राऊत आहे. देवेंद्र फडणवीस एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी गेले ही राऊत यांची पोटदुखी आहे. ह्यांना पूर्ण दिवस उर्दू भवन आणि इतर गोष्टी दिसतात ह्याला सहन होत नाही परत संजय राऊत याने खोटेनाटे आरोप केले तर बारसु मध्ये असलेल्या उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे यांच्या नातेवाईकांच्या नावाने जमिनी कशा आहेत ते सगळ्या पुराव्यानिशी जाहीर करू आणि तुला अजून नागडा करीन लक्षात ठेव तुम्ही नावे जाहीर करा समोर पत्रकार परिषद घेऊन मी नाव जाहीर करतो संजय राऊत तू एकाचा असशील तर नाव जाहीर कर विनायक राऊत याचे बारसु मध्ये मोठी दंगल घडविण्याचे षडयंत्र आहे यांची गाडी तपासली पाहिजे मुंबईत गुंड हत्यार शस्त्र मागवले आहेत. उद्धव ठाकरे विनायक राऊत यांची घरे तपासली पाहिजेत कोकणात काय वाईट घडलं तर याला जबाबदार उद्धव ठाकरेची टोळी असेल आंदोलक पाकिस्तानी नसले तरी कोकणातले नाही आहेत. संजय राऊतच पाकिस्तानवर किती प्रेम आहे.ते काल आम्हाला समजलं मलिक सोबत झोपायला गेलेला तो हे पार्सल आता पाकिस्तान ला पाठवले पाहिजे. कर्नाटक निकालानंतर संजय राऊत पाकिस्तानला निघून जाणार त्यांना हवं तर मी येतो सोडायला ढुंगणावर लात मारायला संजय राऊत तुम्हाला शिवरायांच्या साताऱ्याच्या गादिबद्धल शिवरायांच्या वंशजा बद्धल एवढा द्वेष का आहे. त्यांनी 10 मिनिटं आपली सिक्युरिटी बाजूला करावी मग मावळे तुमची काय अवस्था करतील सुपारी कशी घेतात हे उद्धव ठाकरेला विचारावं त्याच आयुष्य हे सुपारीवर चालत तो सुपारी बाज आहे ज्या दिवशी उद्धव ठाकरे सुपारी घेणं बंद करेल तेव्हा कुपोषित म्हणून जाहीर करावे लागेल

error: Content is protected !!