खामदेव नाका येथे भक्तीभावात गणेश जयंती उत्सव सुरू

गणेश दर्शनासाठी भाविकांची भलीमोठी रांग

बांदा (प्रतिनिधी) : बांदा-इन्सुली खामदेव नाका येथील गणेश मंदिर, इन्सुली येथे ‘नवदूर्गा कला क्रीडा मंडळ’ आणि समस्त कुडवटेंब ग्रामस्थ यांच्या वतीने यंदाचा ‘माघी गणेश जयंती’ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतआहे. बुधवार दि. २१ जानेवारी आणि गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा संपन्न होत असून, यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली.

​या निमित्ताने बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता पूजा अर्चा आणि ब्राह्मण भोजनाने झाली ​गुरुवार दि. २२ जानेवारी रोजी ​पहाटे ५.०० वा. सत्यविनायक पूजा,​ सकाळी ८.०० वा. श्रींची पूजा, महाआरती आणि तीर्थप्रसाद,​ दुपारी १.०० वा. महाआरती होऊन शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
सायंकाळी भजनाचा कार्यक्रम या निमित्ताने गुरुवार रात्री ९.०० वाजता पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ला यांचा ‘महाकाली लिंग स्थापना’ हा भव्य पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

​या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.

error: Content is protected !!