सावंतवाडी( प्रतिनिधी) : सेवा सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संस्था सिंधुदुर्ग यांनी दरवर्षीप्रमाणे बौद्ध समाजातील तरुण-तरुणींना अनुरूप वधू वर निवडता यावा यासाठी रविवारी डॉ बाबासाहेब सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित केलेल्या वधु वर मेळाव्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदर मेळाव्याचे उद्घाटन तथागत नागरी पतसंस्थेचे चेअरमन तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू,संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम व मान्यवरांचे हस्ते बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमाना अभिवादन करण्यात आले,त्यानंतर बौद्ध धम्माच्या रीतीरीवाजा नुसार त्रिशरण पंचशील म्हणून व संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.यानंतर ममता जाधव यांनी सुमधुर आवाजात बुद्ध धम्म गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी संस्थेचे सचिव मिलिंद सरपे,मिलिंद जाधव, मोहन जाधव,आनंद धामापूर कर,आनंद सावळे,श्रद्धा कदम, ममता जाधव व मान्यवर या उपस्थित होते .
माजी सचिव पत्रकार मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर आनंद सावळे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी अरविंद वळंजू यांनी बौद्ध समाजात शिक्षणाचे प्रमाण जसे वाढले त्याच प्रमाणात बेकारीही वाढली मात्र वधू-वरांच्या अपेक्षा त्याच असल्याने त्यामुळे अनुरूप वधू वर मिळणे दिवसेंदिवस कठीण झाल्याने लग्नाची मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच या समस्येवर फुंकर घालण्यासाठी हा आमचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले तर अध्यक्षीय मनोगतातून सूर्यकांत कदम यांनी वधू वरांना आम्ही व्यासपीठ दिला आहे यातून योग्य वधू वर निवडा आणि सुखी संसार करा असा संदेश त्यांनी यावेळी उपस्थितच ना दिला. यावेळी आनंद देवगडकर यांनीही शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा कदम व ममता जाधव यांनी केले तर आभार आनंद धामापूरकर यांनी केले यावेळी सुमारे 50 वधुवर पालकांनी नोंदणी केली होती.












