श्री गांगोमाऊली क्रीडा मंडळाच्या स्वाभिमानाचे, रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : श्री गांगोमाऊली क्रीडा मंडळ फोंडाघाट, गांगोवाडी या संस्थेने, रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे .त्यानिमित्ताने सलग पाचव्या वर्षी ” गांगोवाडी प्रीमियर लीग ” ची ‘श्रीदेव वाघोबा चषक’ भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली 25 वर्षे श्री गांगो माऊली क्रीडा मंडळ आपल्या मंडळाच्या व ग्राम ग्रामस्थांच्या सहभागातून क्रीडा क्षेत्रासह सांस्कृतिक शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे शाळातील मुलांना प्रोत्साहन पर शिष्यवृत्ती गरजूंना तसेच रुग्णांना आर्थिक मदत प्रसंगी सहकार्य प्रसंगी एकी मधून तत्परता अशा अनेक बाबींमुळे गावामध्ये स्वपरिचित आहे आज 25 वा रोग्य महोत्सव साजरा करताना वाडी आणि मंडळामध्ये उत्साहाचे वातावरण आहे
चालू वर्षी या स्पर्धा १३/१४/१५ फेब्रुवारी २६ रोजी सकाळी आठ पासून गांगो मंदिर रोड जवळ तयार केलेल्या भव्य मैदानावर सुरू राहतील. तारीख १३ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता उद्घाटन आणि १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा, शिवसेना उपनेते संजय आग्रे, सरपंच सौ. संजना आग्रे आणि नूतन जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे यांचे उपस्थितीत होणार आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित वाघोबा चषक भव्य ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या, ग्रामीण भागातील रांगड्या थराराचा क्रीडा रसिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा. असे आवाहन मंडळाचे संदीप (बाली) जोईल – अध्यक्ष, प्रसाद (छोटू) सावंत– खजिनदार व भालचंद्र (भामा) सावंत– सल्लागार व सहकाऱ्यांनी केले आहे…













