मडुरा (प्रतिनिधी) : ग्लोबल फाउंडेशनकडून दिली जाणारी “ज्ञानज्योत शिष्यवृत्ती” मडुरा हायस्कूल मधील सात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू व होतकरू विद्यार्थीसाठी ही शिष्यवृत्ती म्हणजे आशेचा किरण आहे. दरवर्षी जिल्ह्यातील 150 गरजू विदयार्थ्यांना ही शिष्यवृत्ती वितरित केली जाते. ग्लोबल फौंडेशन विविध शैक्षणिक, सामाजिक, तंत्रज्ञान व आरोग्य विषयक उपक्रम राबवते. न्यू इंग्लिश स्कुल मडुरा या प्रशालेतील दरवर्षी सात विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती देऊन उपकृत करते.
प्रशालेतील मधुरा लांबर, जानवी परब, चांदोबा परब, सिद्धी गावडे, आदित्य जाधव, पुंडलिक सातार्डेकर व साहिल गवस या विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये रुपये 3600/- ज्ञानज्योत शिष्यवृत्ती जमा केली आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक व संस्थेचे पदाधिकारी यांनी ग्लोबल फाउंडेशनचे संचालक आ. प्रसाद परब व संस्थेची आदरयुक्त कृतज्ञता व्यक्त केली.












