कणकवली (प्रतिनिधी) : नाटळ जि प मतदारसंघातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल नवनिर्वाचित जि प सदस्य संदेश सावंत यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ कणकवली च्या वतीने सत्कार करण्यात आला. अनंत पारकर, कल्याण पारकर आनंद पारकर चेतन मुंज यांनी संदेश सावंत यांच्या निवासस्थानी जात त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
जि प सदस्य संदेश सावंत यांचा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळाच्या वतीने सत्कार












