कणकवली (प्रतिनिधी) : जीवाचा गोवा करायला कणकवली शहरातील तिघे आणि त्यांचा अन्य तालुका शहरातील युवक शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी गोव्याला गेले. जीवाचा गोवा करताना कसिनोत नशीब आजमवायला म्हणून गेले आणि मुद्दल डबल ट्रिपल करण्याच्या नादात खिसा रिकामी झाला. खिसा रिकामी करून गोव्याहून रिटर्न येत असताना खेळीसाठी अनलकी असल्यावरून शाब्दिक वादावादी झाली. आणि शुक्रवारी मध्यरात्री कणकवलीतील पोचल्यावर फ्लायओव्हर खालील चौकात पंचाईत करणारा वाद मुद्द्यावरून गुद्यावर आला. या वादात एकाची कानपूर लाईन गरम झाली. कसिनोत लॉस झाल्यानंतर कणकवलीत झालेल्या या ढिश्याव ढिश्याव ची शहरात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.
कसिनोत लॉस आणि कणकवलीत ढिश्याव ढिश्याव












