वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री औदुंबर शिवालय मंदिर खांबाळेचा ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त १५ फेब्रुवारी व १६ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० ते १०.३० यज्ञ आणि महाआरती, सायंकाळी ४.०० ते ५.३० हळदी कुंकू आणि रात्री भजन, १६ फेब्रुवारीला अभिषेक आणि महाप्रसाद. आपण सर्व ग्रामस्थांनी आणि भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुतलवाडी विकास मंडळ भुतलवाडी खांबाळे यांनी केले आहे.
औदुंबर शिवालय मंदिर खांबाळेचा १५ फेब्रुवारीपासून वर्धापन दिन









