वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री शंकर प्रासादिक सेवा मंडळ नाधवडे यांच्यावतीने रविवार दिनांक १५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी 2026 दरम्यान श्री महादेव मंदिर नाधवडे येथे महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ८ ते ११ वा. लघुरुद्र व आरती, सकाळी ११ वाजता ग्रामदैवतांसह पालखीचे आगमन, सायंकाळी ३ ते ५ वा. संगीत भजने, तर रात्री १० वाजता गावातील शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ वाजता श्री चरणी इच्छुकांचे अभिषेक, सायंकाळी ३ ते ५ वाजता संगीत भजने, रात्री ९ वाजता पालखी प्रदर्शना होणार आहे. तर मंगळवारी दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०. ३० वाजता ग्रामदैवतांसह श्रींचे स्नायू स्नान व पालखी प्रदर्शना, दुपारी १२ ते २ वा. महाप्रसाद, संगीत भजने व रात्री ११ वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, हा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे दररोज दुपारी १ वाजता व सायंकाळी सात वाजता महाआरती होईल तसेच रात्री साडेआठ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री शंकर प्रासादिक सेवा मंडळ नाधवडे यांनी केले आहे.
नाधवडे येथे १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम










