तळेरे (प्रतिनिधी) : एलिट स्लिंगशॉट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने पहिली राष्ट्रीय स्लिंगशॉट चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच भुवनेश्वर, ओडिशा येथे पार पडली. या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत सिंधुदुर्गच्या पाच खेळाडूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत खेळाडूंनी विविध गटांत पदकांची कमाई केलीसिंगल इव्हेंटमध्ये -स्वप्नाली कारेकर आणि प्रज्वल हिरोजी यांनी सुवर्णपदक पटकावले, तर कु.दुर्गा जाधव हिने रौप्यपदक आणि स्मरण पैकेरी याने कांस्यपदक मिळवले.
ग्रुप इव्हेंटमध्ये -कु.स्वरूप एकावडे यांनी कांस्यपदकावर नाव कोरले.
सिंधुदुर्गच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्याला पदके मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सर्व खेळाडूंना सिंधुदुर्गचे महासचिव स्वरूप एकावडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, एडिट क्लिक शॉट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुकांता राव कुटीकुप्पल, एलिट स्लिंगशॉट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संकल्प वाघमारे आणि महासचिव दीपक शिर्के आदींनी सिंधुदुर्गातील सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी खेळाडूंची सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












