गांगोमंदिर येथील सोलर हायमास्ट चे जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते लोकार्पण

पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून मंजूर झाला होता सोलर हायमास्ट

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नगरोत्थान महा अभियान या योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कणकवली शहरातील गांगो मंदिर येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्फत मंजूर झालेल्या सोलार हाय मास्ट कामाचे लोकार्पण ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हे काम मंजूर करण्यात आले होते. गांगो मंदिर जवळील नागरिकांची देखील या कामाची सातत्याने मागणी होती. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी नगरसेवक शिशिर परुळेकर यांच्या माध्यमातून या कामाकरिता निधी पालकमंत्र्यांच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आला होता. या हायमास्ट मुळे या भागातील रात्रीच्या वेळी असणारे काळोखाचे वातावरण आता उजेडमय होणार असून नागरिकांनी देखील या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. या शुभारंभ प्रसंगी नगरसेविका आर्या राणे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, औदुंबर राणे, डॉ. संदीप नाटेकर, नगरसेवक राकेश राणे, परेश परब, माजी नगरसेवक अभय राणे, नवनीत बागवे, ओंकार चव्हाण, रेखा गावडे, महेश सावंत प्राजक्ता राणे आदि उपस्थित होते.

error: Content is protected !!