परुळे आनंदवाडी येथे १५ ते १६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : पांडवकालीन शिवमंदिर देवस्थान कमिटी आनंदवाडी परुळे या कमिटीच्या वतीने येथील प्राचीन पांडवकालीन शिवमंदिरात 15 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते एक वाजता अभिषेक आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी पाच वाजता स्थानिक भजने, सायंकाळी सहा वाजता जय गणेश प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन तर रात्री आठ वाजता ह. भ. प. विलास केरकर तारकर्ली यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तर सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते एक वाजता श्री सत्यनारायण महापूजा आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक ते तीन वाजता महाप्रसाद, सायंकाळी साडेसहा वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ भोगवे यांचे भजन होणार आहे. तर रात्री आठ वाजता सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग यांचा पौराणिक नाट्यप्रयोग चौरंगीनाथ महिमा हे दशावतारी नाटक होणार आहे. पहाटे काकड आरतीने या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पांडवकालीन शिव मंदिर देवस्थान कमिटी आनंदवाडी परुळे यांनी केले आहे.

error: Content is protected !!