वैभववाडी (प्रतिनिधी) : अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे हे दिनांक १४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता वैभववाडी येथे आगमन होणार आहे. या दौऱ्यादरम्यान ते गुरव समाजातील विविध समस्या जाणून घेऊन समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत.
त्यांचा नियोजित कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. शनिवार १४ राेजी सायंकाळी ७ वाजता श्री.देव गांगेश्वर मंदिर ऐनारी दर्शन. रविवार दि. १५ रोजी सकाळी ११ वाजता श्री.महादेव मंदिर नाधवडे श्री महादेव मंदिर खांबाळे ( गुरव बंधू ) दर्शन १ वाजता दर्शन.४) श्री.देव गांगेश्वर मंदिर कुर्ली दर्शन दुपारी १.३० वाजता. श्री.देव विमलेश्वर मंदिर वाडा देवगड दर्शन सायंकाळी ५ वाजता. तरी गुरव ज्ञाती समाज बांधव सिंधुदुर्ग यांनी श्री.अण्णासाहेब यांची भेट घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन गुरव ज्ञाती समाज बांधव सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष संजय सावंत ,व गुरव ज्ञाती समाज बांधव वैभववाडी तालुका अध्यक्ष गुरुनाथ गुरव यांनी केले आहे









