आनंद मिळवण्यासाठी खेळ खेळा

नांदगाव (प्रतिनिधी) : कोणताही खेळ खेळताना जो खेळाचा आनंद लुटतो तोच खरा खेळाडू ठरतो. कोण तरी हरल तरच कोणतरी जिंकणार आहे, यामुळे खेळताना खेळाचा आनंद घेणे महत्त्वाचे. आजच्या क्रीडा स्पर्धेतून भविष्यात चांगले खेळाडू घडून तोंडवली कॉलेजचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर जाईल असे सांगून प्रत्येक विद्यार्थ्याने ताणतणावमुक्त होण्यासाठी नियमितपणे व्यायामासाठी वेळ द्यावा असे आवाहन कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचे क्रीडा शिक्षक व ज्युदो-कराटे प्रशिक्षक तथा कणकवली तालुका समन्वयक दत्तात्रय मारकड यानी केले. ते तोंडवली येथे सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी, कृषी, इंजिनिअरींग कॉलेजच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

तत्पूर्वी प्रशिक्षक दत्तात्रय मारकड याच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, कृषी प्राचार्य योगेश पेडणेकर, फार्मसी प्राचार्य मनोज कदम, इंजिनिअरींग प्राचार्य सुरजकुमार सातवेकर, बी. एड. प्राचार्य सच्चिदानंद कनयाळकर, विद्यार्थी प्रतिनीधी निखिल हिवसे, हंबिरराव देसाई याच्यासह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठया संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना मारकड म्हणाले की, क्षेत्र कोणतेही असूदे जेवढी क्षमता आहे तेवढी मेहनत घेतलात तरच यश आपल्याकडे येते. खेळताना घामाणे आंघोळ करणारेच इतिहास बदलत असतात. याच खेळामुळे शरीर तंदुरुस्त राहण्याबरोबर संयम, जिद्द, शिस्त लागते. यामुळे खेळात ईष्या ठेवा व संघर्ष करा मात्र व्देष करू नका असे त्यांनी याप्रसंगी खेळाडूंना आवाहन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार व स्वागत करत विद्यार्थी प्रतिनीधी निखिल हिवसे, हंबिरराव देसाई याच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडाज्योत प्रज्वलित करत क्रीडा स्पर्धा सुरु करण्यात आली. वार्षिक क्रीडा स्पर्धेत अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना उदंड प्रतिसाद आणि अनोख्या पद्धतीने झालेले उद्घाटन प्रक्षेकांच्या आकर्षकनाचा केंद्रबिंदू ठरला.

error: Content is protected !!