छत्रपतीच्या शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन – पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा

‘दिलेला शब्द पूर्ण करायचाच’ खासदार नारायण राणे यांच्या शिकवणीतून सांस्कृतिक भवनाला गती

प्रशासकीय मान्यतेसह आठ कोटीची तरतूद केल्याचे जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे.येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने राज्य शासनाच्या जागेवर सांस्कृतिक व नाट्यगृहाचे भूमिपूजन करणार आहोत.या सांस्कृतिक व नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आठ कोटींची तरतूद आपण केलेली आहे. अशी घोषणा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. खासदार नारायण राणे यांची आम्हाला नेहेमी शिकवण आहे की दिलेला शब्द पूर्ण करायचा असतो.तो शब्द पूर्ण करताना मनस्वी समाधान होत असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.

कणकवली करांची आणि मराठा समाजाची अत्यंत जुनी मागणी म्हणजे कणकवलीत आपल्या हक्काचं नाट्यगृह व सांस्कृतिक भवन असलं पाहिजे.ही वर्षानुवर्षाचे मागणी आहे.कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटत असताना आपल्या कणकवली शहरांमध्ये नाट्यगृह नाही. मराठा समाजासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन नाही, याबाबत सातत्याने मागणी केली जात होती.त्याचवेळी आपण सर्वांना एक शब्द दिला होता.
आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या परवानग्या उपलब्ध झालेल्या आहेत.

त्या पलीकडे जाऊन लागेल तो निधी उपलब्ध करू. परंतु एक चांगले नाट्यगृह आणि मराठा समाजासाठी हक्काचे सांस्कृतिक भवन यांचे पूर्ण पद्धतीने चांगल्या पद्धतीचे नियोजन केलेले आहे.

त्याप्रमाणे येणाऱ्या शिवजयंतीला आपण आपलं हक्काच सांस्कृतिक भवन व नाट्यगृह मराठा समाजाला विश्वासात घेऊन, सर्वांच्या आशीर्वादाने आमच्या कणकवलीकरांसाठी भूमिपूजन करत आहोत. असे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केल्या आहे.

error: Content is protected !!