मराठी भाषेतून ज्ञानार्जन ही काळाची गरज– मुख्याध्यापक प्रसाद पारकर

फोंडा हायस्कूल मध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेत याज्ञिका हळदिवे,जानवी चव्हाण, आणि निबंध स्पर्धेत मनश्री तावडे, प्रथम !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपला देश विविधतेने नटलेला आहे, त्यामुळे आपली अभिजात मराठी भाषेमध्ये ज्ञानार्जन करणे ही येथील प्रत्येकासाठी अत्यंत गरजेची आहे. मात्र इतर भाषांचा आदर, सन्मान राखणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे असे उद्गार मुख्या .प्रसाद पारकर यांनी व्यक्त केले. ते न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट आयोजित मराठी भाषा गौरव दिन सोहळ्यात बोलत होते …

सोहळ्याचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करून आणि कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. संतोष जोईल यांनी तर स्वागत मराठी विषयाच्या सौ. आर्या भोगले यांनी केले. यावेळी प्रा.वाळवे, प्रा.पाटील, प्रा.नेवरेकर, प्रा .वाघमोडे, प्रा.नानचे, प्रा. घुंगरड इत्यादी उपस्थित होते. यावेळी अस्मि मेस्त्री हीने नाही मराठी भाषेची थोरवी आपल्या दमदार पोवाड्यातून सादर केली. तर इयत्ता नववी अव पाचवी अ च्या विद्यार्थिनींनी समूहगान सादर करून वाहवा मिळवली. निवेदी बोकट हिने मराठी भाषा गीत सादर केले. संत साहित्यावर मार्गदर्शनपर विवेचन प्रा. फड यांनी केले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध निबंध स्पर्धेत मनश्री तावडे, दीक्षा नानचे, शमी सावंत, दुर्वांक नातू तर वक्तृत्व स्पर्धेत याज्ञिका हळदिवे, निकिता घाडी, वेदिका लाड, मनस्या फाले, रसिका परब, जानवी चव्हाण यांनी अनुक्रमे नंबर पटकावले शेवटी दीक्षा नानचे हीने आभार प्रदर्शन केले. प्रसायदानाने सोहळ्याची सांगता करण्यात आली…

error: Content is protected !!